- ॲक्टिव्ह रुग्णांनी ओलांडला 60 हजारांचा टप्पा
ऑनलाईन टीम / चंदीगड :
पंजाबमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यातील रुग्णांनी 3.92 लाखांचा टप्पा पार केला आहे. मागील 24 तासात तब्बल 6 हजार पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले. काल 6,798 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 157 जणांनी आपला जीव गमावला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 3 लाख 92 हजार 042 इतका झाला आहे. तर कालच्या दिवशी 6,016 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत 3 लाख 21 हजार 861 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 9 हजार 472 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये आतापर्यंत जवळपास 73 लाख 77 हजार 560 टेस्ट करण्यात आल्या आहेत. यातील 36,792 टेस्ट काल एका दिवसात करण्यात आल्या. सद्य स्थितीत 60 हजार 709 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 7,845 रुग्णांना अक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तर 213 जण व्हेंटिलेटरवर आहेत.