- 1 लाख पेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त !
ऑनलाईन टीम / चंदीगड :
पंजाबमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. पंजाबमध्ये मागील 24 तासात 857 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 42 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 18 हजार 157 इतका झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबमधील एकूण 1,18,157 रुग्णांपैकी 1 लाख 00 हजार 977 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 3 हजार 603 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
- 13,577 ॲक्टिव्ह रुग्ण
ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये आतापर्यंत जवळपास 19 लाख 51 हजार 623 टेस्ट करण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत 13 हजार 577 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 315 रुग्णांना अक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तर 52 जण व्हेंटिलेटरवर आहेत.