- मागील 24 तासात 1,407 नवे रुग्ण; 66 मृत्यू
ऑनलाईन टीम / चंदीगड :
पंजाबमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच एक दिलासादायक बाब समोर आली आहे. मागील 24 तासात 1,407 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 66 जणांचा मृत्यू झाला. यासोबतच कालच्या दिवशी 2,521 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 5 लाख 83 हजार 474 पोहोचली असून त्यातील 5 लाख 50 हजार 837 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 15 हजार 293 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. वाढती मृत्यू संख्या ही भीतीदायक आहे.
- सद्य स्थितीत 17,344 ॲक्टिव्ह रुग्ण
ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये आतापर्यंत जवळपास 98 लाख 23 हजार 991 नमुने घेण्यात आले आहेत. यातील 61,823 नमुने काल एका दिवसात घेतले गेले. सद्य स्थितीत 17 हजार 344 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 3,024 रुग्णांना अक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तर 240 जण व्हेंटिलेटरवर आहेत.