ऑनलाईन टीम / चंदीगड :
पंजाबमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच आता लुधियानाचे खासदार रवनीत सिंह बिट्टू यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली.
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, माझे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. संसदेत त्यांच्या साथीदारांना देखील कोरोनाची बाधा झाली आहे.ते सर्वजण आता ठीक आहेत. त्यांना चांगले आरोग्य मिळो अशी प्रार्थना देखील त्यांनी ईश्वर चरणी केली आहे.
पुढे ते म्हणाले, कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत आहे. त्यामुळे सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी, असेहीत्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, भारतात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. मागील 24 तासात 56,211 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर 271जणांचा मृत्यू झाला.
तर पंजाबमध्ये सोमवारी 2914 नवे रुग्ण आढळून आले आणि 59 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण आकडा 2,34,602 वर पोहोचला आहे.