संतापाच्या लाटेनंतर बंगाली पक्षाने घेतले मागे
प्रतिनिधी /पणजी
बंगालच्या मुख्यमंत्री या याच आठवडय़ात गोव्यात येत असून त्यांच्या समर्थकांनी तसेच कार्यकर्त्यांनी अत्यंत विध्वेशक पद्धतीने कार्टुन सोशल मीडियावर पाठविली आहे. त्यातून या देशाच्या पंतप्रधानांचा आणि केंद्रीय गृहमंत्र्यांचा अपमान केलेला आहे. भारतीय जनता पक्षाने याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.
बंगाली पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीचे एक कार्टुन तयार केले असून ते अत्यंत अवमानकारक असल्याचे आढळून आले. या संदर्भात संपूर्ण गोव्यात संतापाची तीव्र लाट उमटली. भाजपने सदर प्रकार करणाऱयांचा धिक्कार केला. तसेच अशाप्रकारचे कार्टुन काढून देशाच्या पंतप्रधानांचा अत्यंत निदंनीय प्रकारे अवमान केल्याने तो गुन्हा ठरत असल्याने सदर कार्टुन नंतर सायंकाळी उशिरा बंगाली पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मागे घेतले. या बंगाली पक्षाचे गोव्यात आगमन झालेले आहे हेच मुळी गोव्यातील जनतेमध्ये विध्वेशक संदेश पोहोचविण्याने असे आतापर्यंतच्या सदर पक्षाच्या एकंदरित पोस्टरबाजीवरुन दिसून येते.