ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोना संसर्गामुळे नवीन रुग्णांच्या संख्येत सातत्याने होणारी वाढ आणि मृत्यू लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 6 वाजता लस उत्पादकांसोबत बैठक घेणार आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या या बैठकीत लसींचे उत्पादन वाढविण्यासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सोमवारी सायंकाळी 4.30 वाजता पंतप्रधान मोदी यांनी देशातील प्रमुख डॉक्टर आणि फार्मा कंपन्यांशी चर्चा करून देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला.