कोल्हापूर/प्रतिनिधी
मागील अनेक वर्षे महादेवराव महाडिक यांनी कोल्हापूरच्या जागेवर विधान परिषदेत प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्यामुळे यंदाही तोडीस तोड म्हणून महाडिक कुटुंबातीलच उमेदवार असावा अशी पक्षाची आणि सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती. त्यानुसार पक्षाकडून मला उमेदवारी दिली गेली. त्या अनुषंगाने आम्ही तयारीलाही लागलो होतो. पण आज अचानक दिल्लीतुन वरिष्ठ पातळीवर झालेल्या चर्चेनंतर विधानपरिषदेच्या जागा बिनविरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या सूचनेनुसार मी उमेदवारी अर्ज माघारी घेतलेला आहे.
कोल्हापूरच्या जनतेच्या सेवेसाठी मी सदैव तत्पर होतो व यापुढेही असेनच. त्यामुळे माझ्यावर, माझ्या कुटुंबावर प्रेम करणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांनी संयम राखून पक्षादेशाचा मान राखावा, असे भावनिक आव्हान ही महाडिक यांनी पत्रकातून केले आहे