प्रतिनिधी / पणजी
सोमवारपासून ग्राहकांसाठी पूर्णवेळ सुरू करण्यात आलेल्या पणजी मुख्य मार्केट अजूनही कोरोनाच्या भीतीच्या सावटाखाली आहे. काही दिवसांपूर्वी बारमधील बार चालविणाऱया एकाला कोरोना झाल्याचे समजताच सर्वत्र खळबळ माजली होती. मार्केटही बंद करण्यात आले होते. परंतु आता त्या रूग्णाचा काही थांगपत्ता नसल्याने मार्केटमध्ये ग्राहकांचा ओढा काहीसा कमी झाला आहे. भीतीपोटी बाजार संकुलात ग्राहकांचा अजूनही अल्प प्रतिसाद दिसून येत आहे.
पणजी मार्केट पूर्ववत झाले असले तरीही ग्राहक कमी येत असल्यामुळे आणि योग्यरित्या तपासणी व सेनिटायझरचा वापर होत नसल्यामुळे व्यापाऱयांमध्येही भीती निर्माण झाली आहे. रात्री 8 वाजेपर्यंत मार्केटचा वेळ वाढविण्यात आला असला तरीही 6.30 ते 7 वाजेपर्यंत मार्केट बंद करण्यासाठी सांगितले जाते. याशिवाय मार्केटच्या दरवाज्यावर योग्यरित्या तपासणीही केली जात नाही. मुख्य दरवाजावर व्यापाऱयांच्या तपासणीसाठी सुविधा करण्यात यावी अशी मागणी एका व्यापाऱयाने केली आहे. बाजाराच्या मुख्य द्वारावर सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली असली तरीही कधी कधी तर त्याठिकाणी माणूसही नसतो. याचबरोबर बाजारसंकुलाबाहेरील काही दुकानात सॅनिटायझर तसेच तपासणीसाठी थर्मल गनचा वापर केला जात आहे.