प्रतिनिधी /पणजी
भाटले पणजी येथील श्री सटीभवानी देवस्थानचा वर्धापनदिन व पालखी सोहळा मंगळवार दि. 8 ते 13 मार्च या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. या निमित्त दि. 8 रोजी मंदिरात सकाळी 6वाजल्यापासून धार्मिक विधी सुरू होणार आहेत. सकाळी 7 वाजता अभिषेकला प्रारंभ होईल. दुपारी 12.30 वाजता आरती, तीर्थप्रसाद होईल. संध्याकाळी 7 वाजता नामवंत भजनी कलाकारांचे भजन होईल.
बुधवार दि. 9 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून धार्मिक विधी होतील. सायंकाळी 7 वाजता भजन होणार आहे. गुरूवार दि. 10 रोजी सकाळी धार्मिक विधी, दुपारी 12.30 वाजता आरती व महाप्रसाद होईल. सायंकाळी 8 वाजता श्रींची पालखीतून मिरवणूक काढली जाईल. सदर पालखी मानसभाट ते भाटले परिसरात घरोघरी फ्ढिरविली जाईल.
शुक्रवार दि. 11 रोजी सकाळी धार्मिक विधी होतील. रात्री 8 वाजता सुहासिनींचा जोडव्याचा कार्यक्रम होईल. शनिवार दि. 12 रोजी सकाळी धार्मिक विधी. रात्री 8 वाजता श्रींच्या फ्ढळांची पावणी होईल. रात्री 10 वाजता ‘आयचो पुत सेनेचे भूत’ हे कोंकणी नाटक होईल. रविवार दि. 13 रोजी सकाळी धार्मिक विधी. दुपारी 3 वाजता भाटले स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लबतफ्xढ श्री सत्यनारायण महापूजा होईल. संध्याकाळी 7 वाजता भजन नंतर तीर्थप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल. असे देवस्थान समितीने कळविले आहे.