प्रतिनिधी / शिरोळ
पतीने डॉक्टर असलेल्या पत्नीस मारहाण केल्याने त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना इचलकरंजी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची फिर्याद डॉ. संध्या अविनाश पाटील रा. जांभळी ता. शिरोळ यांनी शिरोळ पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यामुळे जांभळीचे अविनाश बापुसो पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जांभळी येथील डॉक्टर, संध्या पाटील व त्यांचे पती अविनाश पाटील यांच्यात घरगुती कारणावरून वारंवार भांडणे होत. दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजता मोटरसायकलवरून इचलकरंजीकडे जात असताना पत्नी संध्या पाटील यांनी तुम्ही कुठे चालला ? असे अविनाश पाटील यांना विचारले असता तू मला कोण विचारणार ? असे म्हणत अविनाश पाटील याने संध्या पाटील यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. यामध्ये संध्या पाटील या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी इचलकरंजीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबतची नोंद शिरोळ पोलिसात झाली असुन अधिक तपास पोलीस हवालदार पाटील हे करीत आहेत.