वीजमंत्री निलेश काब्राल यांना विश्वास : जागतिक पर्यटन दिन उत्साहात साजरा.श्री गणेश दर्शन सोहळा
प्रतिनिधी /कुडचडे
कुडचडेत होणाऱया दयानंद पर्यटन व संस्कृती ग्रामसाठी शासकीय भूखंड उपलब्ध करुन देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. या प्रकल्पाद्वारे भविष्यात कुडचडेचे पर्यटन क्षेत्रात देशभर नाव होईल, असा विश्वास पालकमंत्री निलेश काब्राल यांनी व्यक्त केले.
दयानंद केंद्राने भारत पर्यटन व गोवा पर्यटन यांच्या सहकार्याने रवींद्र भवनात जागतिक पर्यटन दिनप्रसंगी आयोजित श्री गणेश दर्शन सोहळ्य़ात ते बोलत होते. यावेळी कुडचडे नगराध्यक्ष विश्वास सावंत, तरुण उद्योजक वरुण कुडचडकर, राजेंद्र नाईक, उपनगराध्यक्षा रुचा वस्त, नगरसेवक प्रमोद नाईक, प्रसन्ना भेंडे, अध्यक्ष मोर्तू नाईक, उपाध्यक्ष अशोक नाईक उपस्थित होते.
नगराध्यक्ष सावंत यांनी कला केंद्राने पर्यटन क्षेत्रात केलेल्या कामगिरीची प्रशंसा करुन केंद्राने आणलेल्या प्रकल्पास सहकार्य करण्याचे आवाहन केले. अध्यक्ष मोर्तू नाईक यांनी स्वागत केले. यावेळी त्यांनी पर्यटनाच्या विविध उपक्रमांची माहिती देऊन सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही नाईक यांनी केली.
जेएमडी ग्रुपचे वरुण कुडचडकर यांनी पर्यटनाचे फायदे यावर आपले विचार मांडले. पर्यटनासाठी गोवा जगभर प्रसिद्ध असून पर्यटनाचे व्यवसायिकता जपताना गोव्याच्या पर्यटनाला कलंक लागणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्येणे गरजेच आहे, असे सांगतिले. अनिता नाईक, वनीत वस्त, आनंदी नाईक, विश्वमाला नाईक यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
सोहळ्य़ात पहिल्या दिवशी अतुल्य भारत प्रदर्शन, घुमट आरती स्पर्धा, इको प्रेंडली गणेश रांगोळी, कराओके भक्ती गीत गायन, फुगडी स्पर्धा झाल्या. सूत्रसंचालन बंटी उडेलकर यांनी केले. यावेळी कार्यक्रमास सांगे – केपे वार्ताहर संघ अध्यक्ष समीर भाट, जन उत्कर्ष सचिव नारायण नाईक, गोवा कोकणी अकादमी सदस्य ज्ञानेश्वर नाईक, अंबिका प्रकाशन सांगे संदीप मापारी, कुडचडे महिला मोर्चा अध्यक्ष रजनी नाईक, ज्येष्ठ नागरिक नारायण मलकर्णी, लक्ष्मण मडगावकर, राया देसाई आदी उपस्थित होते. शेवटी उपाध्यक्ष सुभाष नाईक यांनी आभार मानले.