ऑनलाईन टीम / मुंबई :
पवई आयआयटीमध्ये एका विद्यार्थ्याने वसतीगृहाच्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. आज पहाटे साडेचारच्या सुमारास ही घटना घडली.
दर्शन रामधन मालवीया (वय 26) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो मुळचा इंदोरचा रहिवाशी आहे. मागील काही दिवसांपासून तो तणावात होता. या तणावातून त्याने आज पहाटे साडेचारच्या सुमारास इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. तशी सुसाईड नोट सापडल्याचे पोलिसांनी सांगितले.
पवई पोलिसात त्याच्या अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून, त्याचा मृतदेह राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. अधिक तपास पवई पोलीस करत आहेत.