ऑनलाईन टीम / कोलकाता :
पश्चिम बंगालच्या स्वभूमीजवळील कडापारा येथे भाजपच्या प्रचार व्हॅनची तोडफोड आणि ड्रायव्हर, कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी कोलकाता पोलिसांनी आज पाच आरोपींना अटक केली.
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक 8 टप्प्यात होणार असून, पहिला टप्पा 27 मार्चला पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला असतानाच शनिवारी स्वभूमीजवळील कडापारा येथील एका गोदामात पार्क केलेल्या भाजपच्या प्रचार व्हॅनची तोडफोड करण्यात आली. तसेच ड्रायव्हर आणि कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. कोलकाता पोलिसांनी रविवारी कारवाई करत पाच जणांना अटक केली आहे.
दरम्यान, भाजपने सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या गुंडांवर तोडफोड केल्याचा आणि गोदमातील मौल्यवान वस्तू चोरल्याचा आरोप केला होता.