ऑस्ट्रेलियातील अतिवृष्टीचा परिणाम
ऑस्ट्रेलियातील 1141 फूट उंचीच्या विशाल लाल टेकडय़ा (उलुरू रॉक) पर्यटकांमध्ये विशेष लोकप्रिय ओत. पण पहिल्यांदाच मार्च महिन्यात तेथे 40 हून अधिक पाण्याचे प्रवाह लागू झाले आहेत. हे दृश्य लोकांना आकर्षित करणारे ठरले आहे. पण हे सुंदर दृश्य जवळून पाहण्यासाठी लोक त्याच्यानजीक पोहोचू शकत नसल्याची स्थिती आहे. या टेकडय़ांचे सांस्कृतिक महत्त्व आहे.
दरवर्षी येथे जगभरातून सुमारे 4 लाख पर्यटक पोहोचत होते. पण 2019 मध्ये हा परिसर पर्यटकांसाठी बंद करण्यात आला होता. सरकारवर या टेकडीवर चढण्यास बंदी घातली हाती. 3.6 किलोमी उंच आणि 1.9 किलोमीटर रुंदीच्या या टेकडीची निर्मिती 60 कोटी वर्षांपूर्वी झाल्याचे तज्ञांकडून सांगण्यात येते. उलुरू रॉक युनेस्कोच्या वारसास्थळांच्या यादीत सामील आहे.
पूरग्रस्त भागांचा दौरा
अतिवृष्टीमुळे ऑस्ट्रेलियातील हजारो घरे उद्ध्वस्त झाली आहेत. देशातील सुमारे 60 हजार लोकांना पुराचा फटका बसला आहे. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन पूरग्रस्त भागांचा दौरा करत आहेत. रविवारी त्यांनी पश्चिम सिडनी भागाला भेट दिली आहे.