वृत्तसंस्था/ कराची
दक्षिण आफ्रिकेचा संघ बऱयाच वर्षांनंतर प्रथमच पाकच्या दौऱयावर दाखल झाला आहे. पाक आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका भरविली जाणार आहे. ही कसोटी मंगळवारपासून सुरू होणार असून यजमान पाक संघाची घोषणा करण्यात आली आहे. हॅरीस रौफ आणि हसन अली यांचा पाक संघात समावेश करण्यात आला आहे.
या पहिल्या कसोटीसाठी पाकच्या निवड समितीने 17 जणांचा संघ रविवारी जाहीर केला. या पहिल्या सामन्यात इम्रान बट्टला सलामीला फलंदाजीसाठी पाठविण्यात येणार आहे. या मालिकेसाठी बाबर आझमचे संघात पुनरागमन झाले आहे. अलिकडे पाक संघाला न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेत दारूण पराभव स्वीकारावा लागला होता.
पाकचा संघ- अबीद अली, इम्रान बट्ट, अझहर अली, बाबर आझम, फवाद अलम, साऊद शकील, फहीम अश्रफ, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, सर्फराज अहमद, नौमन अली, साजीद खान, यासीर शहा, हॅरीस रौफ, हसन अली, शाहीन आफ्रिदी आणि तबीश खान.