बेळगाव : पहिल्या रेल्वेगेटजवळ प्रजासत्ताक दिनी हातात तिरंगी झेंडे आणि फलक घेऊन बॅरिकेड्स हटावसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी वासुदेव जोशी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. बॅरिकेड्समुळे जीव मुठीत धरून जावे लागते. सर्व रहिवासी व नागरिक बॅरिकेड्सला वैतागले आहेत. या ठिकाणी एक पोलीस नेमावा, गतिरोधक बसवावे, अशी मागणी त्यांनी केली.
जयश्री रेवाळे यांनीसुद्धा हीच मागणी करून सळय़ा बाहेर आलेले दुभाजक हटवावेत, असे सांगितले. याप्रसंगी सुभाष घोलप यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.