ऑनलाईन टीम / पाँडिचेरी :
पाँडिचेरीचे मुख्यमंत्री एन. रंगासामी यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले की, रंगासामी यांची प्रकृती आता स्थिर आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना चेन्नईतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आरोग्य विभागाच्या प्रवक्त्यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आल्याने मुख्यमंत्री एन. रंगासामी यांची पाँडिचेरी मधील इंदिरा गांधी सरकारी मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात चाचणी करण्यात आली होती. त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
पुढे ते म्हणाले, रंगासामी यांची प्रकृती आता स्थिर आहे. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्याने रविवारी त्यांना पुढील उपचारांसाठी चेन्नईमधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, शुक्रवारीच त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यावेळी आरोग्य विभागाकडून 183 जणांची टेस्ट करण्यात आली. त्यातील 11 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.