ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
पाकिस्तानचा राष्ट्रीय फुटबॉलपटू जुनैद आफ्रिदी याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पाकिस्तानच्या खैबर जिल्ह्यातील जमरूद भागात फुटबॉल सामना सुरू असताना ही घटना घडली. पाकिस्तान फुटबॉल संघाने ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.
आफ्रिदी त्याच्या मित्रांसह सामना पाहण्यासाठी गेला होता. त्यावेळी जमिनीच्या वादातून आफ्रिदीच्या भावाचा एका गटाशी वाद सुरू झाला. त्यानंतर दोन गटात गोळीबार झाला. या गोळीबारात आफ्रिदी जागीच ठार झाला. तर त्याचा भाऊ या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे.
आफ्रिदी हा फुटबॉलचा स्टार खेळाडू होता. त्यांच्या हत्येमुळे त्याच्या चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे.