इस्लामाबाद
पाकिस्तानच्या सीनेटमध्ये गुरदीप सिंह हे पहिले शिख सदस्य बनले आहेत. यासोबत ते सत्तारुढ पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पार्टीचे नेता असून त्यांनी शुक्रवारी नुकतीच सदस्यतत्वाची शपथ घेतलेली आहे. गुरदीप सिंह पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या गृह प्रदेश खैबरपख्तूख्वा प्रांतामधून तीन मार्च रोजी सीनेट सदस्य म्हणून निवड करण्यात आली होती. त्यांनी अल्पसंख्याक जागेसाठी झालेल्या मतदानामध्ये आपल्या प्रतिस्पर्ध्यांला मोठय़ा फरकाने हरविले आहे. सीनेट निवडणुकीत गुरदीप सिंह यांना 145 पैकी 103 मतदान पडले, ज्यामध्ये विरोधात असणाऱय़ा जमियत उलेमा ए इस्लाम-एफच्या प्रत्याशी रंजीत सिंह यांना मात्र 25 मतदान मिळालेली आहेत. गुरदीप सिंह यांच्यासोबत सीनेटमध्ये निवड झालेल्या 47 सदस्यांनी शपथ घेतली आहे. यामुळे गुरदीप हे 2021 पासून 2027 पर्यंत सीनेट सदस्य राहणार आहेत. गुरदीप हे 2005 मध्ये अल्पसंख्याक कौन्सलर राहिले आहेत. यासह त्याच्या परिवारातील एक सदस्यांच्या हत्येनंतर 2016 मध्ये तहरीक ए इन्साफ पार्टीमध्ये ते सक्रिय राजकारणात कार्यरत राहिले आहेत.