ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. पाकिस्तान मध्ये देखील दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. पाकिस्तान मध्ये मागील चोवीस तासात 1356 नवे कोरोना रुग्ण आढळले असून कोरोनामूळे 30 जणांनी आपला जीव गमावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार सकाळ पर्यंत 1356 रुग्ण वाढल्याने पाकिस्तानातील एकूण रुग्ण संख्या 57 हजार 705 वर पोहचली आहे. तर आता पर्यंत 1 हजार 197 लोकांचा मृत्यू झाला आहे.
आता पर्यंत आढळलेल्या 57 हजार 705 मधील सिंध मध्ये आता पर्यंत 22,934 रुग्ण, पंजाब मध्ये 20,654 , खैबर – पख्तूनख्वामध्ये 8,080, बलूचिस्तानमध्ये 3,468, इस्लामाबाद मध्ये 1,728, गिलगित – बाल्टिस्तानमध्ये 630 आणि पाकिस्तानच्या कब्जातील काश्मीरमधील 211 रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.