पर्वतांनी वेढलेल्या भागात वास्तव्य
शेजारी देश पाकिस्तानात दशकांपासून एक रहस्यमय समुदाय राहत आहेत. हिंदुकुश पर्वतरांगेने वेढले गेलेल्या ठिकाणी कलाश नावाचा समुदाय राहतो. पर्वतांनी वेढले गेलेले असल्याने आपली संस्कृती सुरक्षित असल्याचे या समुदायाच्या लोकांचे मानणे आहे. पाकिस्तानात पर्वतांदरम्यान राहणऱया कलाश समुदायाच्या परंपरा हिंदूंच्या प्राचीन परंपरांशी मिळत्याजुळत्या आहेत.
अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या पाकिस्तानीत भागात राहणाऱया कलाश समुदायाची गणना तेथील सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या अल्पसंख्याकांमध्ये होते. हिंदुकुश पर्वतांदरम्यान राहणाऱया या समुदायाचे लोक उर्वरित जगाशी संपर्क ठेवत नाहीत. येथील लोकांची पर्वतांवर प्रचंड श्रद्धा आहे. याच भागात अलेक्झांडर द ग्रेटचा विजय झाला होता, ज्यानंतर याला कौकासोश इडिन्कौश या नावाने ओळखले जात होते. ग्रीस भाषेत याचा अर्थ हिंदुस्थानी पर्वत असा होतो. याचमुळे कलाश समुदायाला अलेक्झांडर दर ग्रेटचे वंशजही म्हटले जाते.
महिला अन् पुरुषांचे एकत्र मद्यपान
2018 मध्ये पाकिस्तानच्या जनगणनेत कलाश समुदायाला स्वतंत्र समुदाय म्हणून स्थान देण्यात आले. या जनगणनेनुसार या समुदायात 3800 लोक आहेत. हे लोक माती, लाकूड आणि चिखलाने तयार छोटय़ा घरांमध्ये राहतात. येथे कुठल्याही सणादरम्यान या समुदायाच्या महिला आणि पुरुष एकत्र बसून मद्यपान करतात. यावेळी लोक बासुरी आणि ड्रम वाजतात आणि नाचतात तसेच गाणी गातात. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या बहुसंख्याक लोकसंख्येच्या भीतीपोटी हा समुदाय पारंपरिक अस्त्रांसोबत अत्याधुनिक बंदुका देखील बाळगतो.
घर चालविण्याची जबाबदारी महिलांची
कलाश समुदायात घर चालविण्याची जबाबदारी महिलांची असते. येथे कमाईचे काम बहुतांशकरून महिलाच करतात. गुरं-बकऱया चरविण्याचे काम महिलाच करतात. येथील महिला घरातच पर्स आणि रंगीत माळा तयार करतात. त्यांच्याकडून निर्मित सामग्री पुरुष विकतात. येथील महिलांना श्रृंगाराची मोठी आवड असते. महिला डोक्यावर एक विशेष टोपी आणि गळय़ात दगडांनी तयार केलेली माळा घालतात.
महिलांना स्वातंत्र्य
येथे वर्षभरात 3 सण साजरे केले जातात. यावेळी मुले आणि मुली परस्परांना भेटतातट, त्यादरम्यानच ते परस्परांशी विवाह करतात. महिला आणि युवतींना मनाजोगा साथीदार निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. तर पाकिस्तानातील उर्वरित भागात महिलांना हे स्वातंत्र्य नाही.