छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल
पाकिस्तानात सध्या एक छायाचित्र सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. यात पंजाब प्रांतातील एक मंत्री गटारीच्या मेनहोलसमोर उभे राहून त्याच्या उद्घाटनप्रसंगी प्रार्थना करताना दिसून येतात. या छायाचित्रात पंजाब प्रांतातील आरोग्यमंत्री डॉ. यास्मीन राशिद यांचे सल्लागार असल्याचा दावा करण्यात येत आहे. हे छायाचित्र पंजाब प्रांतातील डेरा गाजी खान येथील असल्याचे समजते.
हे छायाचित्र पाकिस्तानच्या प्रख्यात पत्रकार नायला इनायत यांनी ट्विट केले आहे. त्यानंतर ते सोशल मीडियात व्हायर झाले आहे. प्रताप सिंग नावाच्या एका ट्विटर वापरकर्त्याने यासंबंधी अत्यंत मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. माझे आजोबा त्या भागाशी संबंधित होते. ते भारतात आले याबद्दल देवाचे मोठे आभार मानतो असे त्याने म्हटले आहे. तर किशोर मालवीय या वापरकर्त्याने ‘गटर मिनिस्टर ऑफ पाकिस्तान’ अशी टिप्पणी केली आहे. पाकिस्तान अपेक्षेपेक्षा अधिक प्रगती करत असल्याची खोचक टिप्पणी सोमेश नावाच्या वापरकर्त्याने केली आहे.