ऑनलाईन टीम / कराची :
पाकिस्तानच्या सिंध प्रांताचे गव्हर्नर इम्रान इस्माईल यांना कोरोनाची बाधा झाली आहे. इस्माईल यांनीच याबाबतची माहिती एका ट्विटद्वारे म्हटले आहे.
इस्माईल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘माझा विश्वास आहे की हे कोरोना वगैरे काहीही नाही. मी त्याच्याशी लढण्यास तयार आहे. अल्लाह आम्हाला या साथीवर लढा देण्यास सामर्थ्य देईल. आपणास सांगू इच्छितो की, मार्चमध्ये सिंध प्रांताचे शिक्षणमंत्री सईद गनी यांनाही कोरोनाची बाधा झाली होती. ते आता पुर्णपणे बरे झाले आहेत.’
पाकिस्तानच्या पंजाब आणि सिंध प्रांतांमध्ये कोरोनाचा फैलाव सर्वांधिक आहे. कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी इस्माईल यांनी मागील दहा दिवसांत अनेक महत्त्वाच्या बैठका घेतल्या होत्या. त्यामुळे या बैठकांना उपस्थित असलेल्या उच्चपदस्थांची चिंता वाढली आहे. इस्माईल यांच्यासोबत अन्य एका उच्चपदस्थला कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. सध्या दोघांनाही विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.