चौघांनी न्यायालयात हजर राहून मिळविला जामीन
प्रतिनिधी /बेळगाव
मराठी भाषिक तरुणांना त्रास देण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर अनेक खटले दाखल केले. खडेबाजार पोलीस स्थानकामध्ये पाच खटले दाखल करण्यात आले होते. त्या सर्व खटल्यांमध्ये अटक केलेल्या 36 जणांसह इतरांना जामीन मिळाला आहे. माजी महापौर सरिता पाटील, प्रकाश शिरोळकर आणि इतर दोघांनी न्यायालयात हजर होऊन जामीन घेतला आहे.
बेंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाचा अवमान करण्यात आला. त्यानंतर सीमाभागात संतापाची लाट उसळली. येथील शिवभक्तांनी धर्मवीर संभाजी चौक येथे निषेध सभेचे आयोजन केले. त्यानंतर दगडफेक झाली म्हणून राजद्रोहसारखा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांवर दबाव घालून हा गुन्हा दाखल करण्यात आला. खडेबाजार पोलीस स्थानकात वेगवेगळे पाच गुन्हे दाखल करण्यात आले. एकूण 61 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
याप्रकरणी 38 जणांना अटक करण्यात आली होती तर काही जणांनी अटकपूर्व जामीनसाठी अर्ज दाखल केला होता. अटक करण्यात आलेल्यांमधील दोघांना यापूर्वीच जामीन मिळाला होता.
खडेबाजार पोलीस स्थानकामध्ये गुन्हा क्रमांक 88, 89, 90, 91, 92 असे वेगवेगळे गुन्हे दाखल केले होते. 88 मध्ये प्रकाश शिरोळकर, सरिता पाटील, 89 मध्ये या दोघांसह मयुर बसरीकट्टी, राधे शहापूरकर, 90 मध्ये प्रकाश शिरोळकर, सरिता पाटील, 91 मध्ये पुन्हा चौघांवर गुन्हा दाखल, 92 मध्ये प्रकाश शिरोळकर आणि सरिता पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे चौघेही तिसरे जेएमएफसी न्यायालयात हजर झाले. त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
25 हजार रुपयांचे वैयक्तिक हमीपत्र, तितक्मयाच रकमेचा एक जामीनदार, पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा करू नये, पोलीस तपास अधिकाऱयांना सहकार्य करणे, प्रत्येक तारखेला हजर राहणे, या अटींवर जामीन मंजूर करण्यात आला आहे. या कार्यकर्त्यांच्यावतीने ऍड. शामसुंदर पत्तार, ऍड. हेमराज बेंचण्णावर, ऍड. शंकर बाळनाईक, ऍड. चिदंबर होनगेकर, ऍड. एस. बी. पट्टण हे काम पाहत आहेत.
उच्च न्यायालयातील जामीनवर 27 रोजी सुनावणी
मार्केट पोलीस स्थानकामध्ये 38 जणांवर राजद्रोहचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामधील दोघांना जामीन यापूर्वी मिळाला होता. तर इतर 36 जणांच्या जामीन अर्जावर सुनावणी उच्च न्यायालयात सुरू आहे. सोमवारी त्या जामीन अर्जावर सुनावणी होणार होती. मात्र ती पुन्हा पुढे ढकलली असून आता गुरुवार दि. 27 रोजी त्यावर सुनावणी होणार आहे.
शुभम शेळके आणि अंकुश केसरकर यांना जामीन
कॅम्प पोलीस स्थानकामध्ये महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके आणि उपाध्यक्ष अंकुश केसरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुह्यांमध्ये पाचवे कनिष्ट दिवाणी न्यायालयाने दोघांनाही जामीन दिला आहे. त्यामुळे त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.
या दोघांना 1 लाख रुपयांचे वैयक्तिक हमीपत्र आणि तितक्मयाच रक्कमेचे दोन जामीनदार, पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा करु नये, पोलिसांना सहकार्य करणे या अटींवर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. या दोघांच्यावतीने ऍड. महेश बिर्जे, ऍड. रिचमन रिकी आणि ऍड. एम. बी. बोंदे हे काम पाहत आहेत.