प्रतिनिधी/ नवारस्ता
व्हाट्स अप ग्रुपवर अश्लील व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी अखेर संशयित आरोपी आणि पाटण नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक,सचिन किसनराव कुंभार वय 45 रा नवीन स्टँड पाटण याच्या विरोधात पाटण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून या गुह्याची फिर्याद महेंद्र तुकाराम चव्हाण वय 51 रा (मोरे गल्ली) पाटण यांनी पाटण पोलीस ठाण्यात दिली आहे.
दरम्यान पोलिसांनी पाटण शहरात सर्वत्र सचिन कुंभार याचा शोध घेतला असता शनिवारी सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसांच्या हाती लागला नव्हता अशी माहिती पाटण पोलिसांनी दिली.
याबाबत पाटण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ’पाटण प्रेस’ या नावाने असलेल्या व्हाट्सअप ग्रुप वर दिनांक 15 रोजी सायंकाळी 4.32 वाजता पाटण येथील सचिन किसनराव कुंभार वय 45 रा पाटण याने एक अश्लील व्हिडीओ व्हायरल केला या ग्रुपवर महिला,महिला अधिकारी तसेच पत्रकार,आणि अनेक प्रतिष्ठित मान्यवर आहेत.
मात्र सचिन कुंभार याने व्हायरल केलेला हा अश्लील व्हिडीओ तमाम महिला वर्गाला लज्जा उत्पन्न होईल असा घृणास्पद असल्याची फिर्याद महेंद्र तुकाराम चव्हाण वय 51 रा मोरे गल्ली पाटण यांनी पाटण पोलिसांत दाखल केली आहे.
संशयित आरोपी सचिन कुंभार याचा पाटण पोलिसांनी पाटण शहरात कसून शोध घेतला असता शनिवारी सायंकाळी उशिरापर्यंत कुंभार पोलिसांच्या हाती लागला नसल्याची माहिती ही पाटण पोलिसांनी दिली.
या घटनेचा तपास पाटण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन चोखंडे करीत आहेत.