नौदल जवानांच्या मदतीने शोधकार्य मोहीम, धोकादायक मगरीमुळे शोधकार्य थांबविले.
प्रतिनिधी /वाळपई
डिचोली तालुक्मयातील पाळी गावात स्फोटकांचा गोदाम फोडून मोठय़ा प्रमाणात स्फोटके चोरून नेण्याचा प्रकार घडला. याबाबत डिचोली पोलिसांनी केलेल्या चौकशीत तीन संशयिताना ताब्यात घेण्यात आले आहे. सुमारे 100 किलो स्पोटकापैकी पैकी 25 किलो स्फोटके पाडेली येथील नदीवरून म्हादई नदीच्या पात्रात फेकण्याचा प्रकार घडला. या संदर्भाचा शोध घेण्याचा प्रयत्न शनिवारी दिवसभर पोलिस यंत्रणा व नौदलाच्या जवानांनी केला मात्र सदर पात्रामध्ये धोकादायक मगर असल्यामुळे हे शोधकार्य अर्ध्यावर सोडून द्यावे लागले. विसभर हे शोधकार्य सुरू होते. यामुळे अचानकपणे मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये चर्चेचा विषय झाला व दिवसभर मोठय़ा प्रमाणात सदर पुलावर शोध कार्याच्या कार्यात गुंतलेल्?या जवान व पोलिस यंत्रणा त्यांचे कार्य पाहण्यासाठी नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती.
याबाबतची माहिती अशी की डिचोली तालुक्मयातील पाळी या ठिकाणी स्फोटकांचा मोठा गोदाम आहे. या गोदामांमध्ये शुक्रवारी चोरी होण्याचा प्रकार घडला .या गोदामाचे जवळपास शंभर किलो स्फोटके गायब झाल्याची बाब उघडकीस आल्यानंतर पोलिस यंत्रणेने याची गांभीर्याने दखल घेऊन या संदर्भात तपास हाती घेतला. या तपासाच्या दरम्यान सत्तरी तालुक्मयातील वांते व पणशे या गावातील दोघांना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून करण्यात आलेल्या तपासामध्ये 75 किलोग्रामचे स्फोटके हाती लागले मात्र 25 किलो स्पोटके गायब असल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर खोदून तपासणी करण्यात आल्यानंतर सदर 25 किलो स्फोटके पाडेली-धामसे या सत्तरी तालुक्मयात असलेल्या पुलावरून म्हादई नदीच्या पात्रात फेकण्याचा प्रकार घडला .त्याचा शोध घेण्यासाठी शनिवारी डिचोली पोलीस स्थानक अधिकारी संशयितांना घेऊन सदर ठिकाणी पोहोचले व शोधकार्याला सुरुवात झाली .गेल्या काही दिवसांपासून मोठय़ा प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे नदीचे पाणी गढूळ झालेले आहे .त्यामुळे सुरुवातीला शोधकार्याला आडकाठी निर्माण झाली. मात्र ही गंभीर स्वरूपाची बाब असल्यामुळे नौदल जवानांना पाचारण करण्यात आले. यासाठी पाणबुडे आणण्यात आले होते. दुपारी तीन वाजेपर्यंत शोध कार्य सुरू होते. मात्र सदर नदीच्या पात्रामध्ये मोठय़ा प्रमाणात मगरी आहेत .सदर मगरी अत्यंत धोकादायक स्वरूपाच्या आहेत .यामुळे अनेक वेळा शोधकार्याला आडकाठी निर्माण झाली. पाण्यात मगरीचा वावर आढळून आल्यानंतर हे शोधकार्य अर्ध्यावर सोडून देण्यात आले .
दरम्यान याबाबत पोलिस अधिकाऱयांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार अजून पर्यंत सदर पाण्यामध्ये फेकलेले स्फोटके जप्त झालेले नाहीत .येणाऱया काळात पुन्हा एकदा शोध कार्य हाती घेण्यात येणार असल्याचे पोलिस अधिकाऱयांनी स्पष्ट केले. स्पोटके गायब होणे अत्यंत गंभीर स्वरूपाचा प्रकार. मात्र एवढय़ा प्रचंड प्रमाणात गोदामामध्ये स्फोटके भरून ठेवणे हा सुद्धा गंभीर स्वरूपाचा प्रकार असून गोदामाच्या मालका विरोधात डिचोली पोलीस स्थानकांमध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
दरम्यान या संदर्भात मिळालेल्या अधिक माहितीनुसार शुक्रवारी संशयितांची एक पार्टी सदर भागांमध्ये झाली होती. दारू पिल्यानंतर संशयितांनी सदर ठिकाणी असलेल्या गोदामाच्या टाळे फोडून सदर गोदामातील शंभर किलो पेक्षा जास्त स्फोटके चोरण्याचा प्रकार घडला. याबाबतची वार्ता मिळताच डिचोली पोलीस स्थानकाच्या अधिकाऱयांनी सदर ठिकाणी तातडीने धाव घेऊन या संदर्भात तपास त्वरित हाती घेतला. स्फोटके हाताळणे व ते चोरून नेणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. कारण याचा गैरवापर झाल्यास मोठय़ा प्रमाणात संकट निर्माण होऊ शकते. याचा सारासार विचार करून पोलिसाने याबाबत गांभीर्याने तपासाची चपे हाती घेतली व त्या संदर्भात तपास केला. दरम्यान अचानकपणे पाडले पुलावर पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आल्यानंतर नागरिकांना यासंदर्भात आश्चर्य वाटले. काहींनी यासंदर्भाची वार्ता इतर भागातील नागरिकांना देऊन पुलावरून अज्ञात इसमाने उडी घेतली असून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिस यंत्रणा करीत असल्याचे सांगितले .मात्र घटना वेगळय़ा स्वरूपाची होती. नौदलाच्या जवानांना शोध कार्यासाठी पाचारण करण्यात आल्यानंतर सदर नदीच्या पात्रामध्ये स्फोटके लपवून ठेवण्याचा प्रकार घडल्याचे समोर आले .संध्याकाळी उशिरापर्यंत सदर पुलावर नागरिकांनी शोध कार्य पाहण्यासाठी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती. कोणत्या प्रकारची आडकाठी निर्माण होणार नाही याची विशेष दखल घेऊन वाळपई पोलीस स्थानकातर्फे मोठय़ा प्रमाणात पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मात्र मगरीचा वाढता धोका यांच्या पार्श्वभूमीवर हे शोध कार्य शेवटी थांबवावे लागले.