नवी दिल्ली
चालू वर्षातील मे महिन्यात भारताची पामतेल आयात 48 टक्क्यांनी वाढून 7,69,602 टनावर राहिली आहे. चालू वर्षात मे मध्ये एकूण वनस्पती तेलाची आयात 68 टक्क्यांनी वाढून 12.49 लाख टनावर राहिली जी एक वर्षाच्या अगोदर 7.43 लाख टन होती. सदरची माहिती सॉल्वंट एक्सटॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया (एसईए) यांनी दिली आहे.
लॉकडाऊनमधून दिलासा मिळत गेल्याने मागणीत झालेली वृद्धी या कारणास्तव मे महिन्यात वनस्पती तेलाची आयात मागील महिन्याच्या तुलनेत 19 टक्क्यांनी वाढली आहे.
एसईएच्या आकडेवारीनुसार कच्च्या पामतेलाची (सीपीओ) आयात चालू मे महिन्यात 53 टक्क्यांनी वाढून 7.55 लाख टनावर राहिली आहे. वर्षाअगोदर समान कालावधीत 3.60 लाख टन होती.
ठळक बाबी
wकच्चे पाम कर्नेल तेला(सीपीकेओ)ची आयात 33.51 टक्यांनी वाढली
wसुर्यफूल तेलाच्या उच्चांकी किमतीने ही आयात वाढीव राहिली.
w इंडोनेशिया आणि मलेशियामधून पामतेलाची आयात.