नवी दिल्ली
खत क्षेत्रातील कंपनी पारादीप फॉस्फेटस् आपला आयपीओ आणण्याचा विचार करत असून याकरीता सेबीकडे अर्ज दाखल केला असल्याचे समजते.
पारादीप फॉस्फेटस् आपल्या या आयपीओमार्फत 1 हजार 255 कोटी रुपयांचे ताजे समभाग जारी करणार आहे. आयपीओकरीता आवश्यक परवानगीसाठीचा अर्ज भारतीय भांडवली बाजारातील नियामक सेबीकडे पारादीपने सादर केला आहे. सध्याचे प्रवर्तक व समभागधारक ऑफर फॉर सेलअंतर्गत 12 कोटी समभाग विक्री करू शकणार आहेत. आयपीओअंतर्गत जमा केलेल्या पैशातून 642 कोटी रुपयांचा वापर गोव्यातील झुआरी ऍग्रो केमिकलच्या विस्तारासाठी करणार असल्याचे समजते. त्याचप्रमाणे 300 कोटी रुपये कर्जफेडीसाठी उपयोगात आणले जाणार आहेत. 31 जून 2021 अखेरपर्यंत 1 हजार 419 कोटी रुपये इतके कंपनीचे कर्ज होते.