काळे झेंडे दाखवून निदर्शने
कुंभोज प्रतिनिधी
शेतीपंपास दिवसा १० तास वीज द्या या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी गेल्या १३ दिवसापासून कोल्हापूर महावितरण कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनास बसले आहेत पण महाविकास आघाडी सरकार जाणीवपुर्वक दुर्लक्ष करू लागल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज उर्फ सतेज पाटील हे कुंभोज येथे कार्यक्रमा निमीत्त जात असताना त्यांना हातकंणगले कुंभोज फाटा येथे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्याकडून काळे झेंडे दाखवित निदर्शन करण्यात आली.
कोल्हापूर महावितरणच्या कार्यालयावर शेतीपंपास दिवसा १० तास वीज, अन्यायी वीज बील वसुली थांबवावे व शेतीपंपाचे चुकीची वीज बिले तातडीने दुरूस्त करावेत या मागणीसाठी २२ फेब्रुवारी पासून धरणे आंदोलनास बसले आहेत. गेल्या १३ दिवसात सरकारकडून कोणतीच विचारणा करण्यात आलेली नाही. जिल्ह्यात धरणे आंदोलनाबरोबर, चक्का जाम, सरकारी कार्यालयात साप सोडणे यासारखे आंदोलन केल्यानंतर आज कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांना काळे झेंडे दाखवित गाड्यांचा ताफा अडविला. गेल्या १३ दिवसापासून बेमुदत धरणे आंदोलनात सतेज पाटील भेट देऊन गेले मात्र तोंडावर गोड बोलत जाणीवपुर्वक दुर्लक्ष करून शासन स्तरावर कोणताच प्रयत्न केला नसल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी पालकमंत्री यांना काळे झेंडे दाखविले.
पालकमंत्री सतेज पाटील घटनास्थळी भेट थांबून कार्यकत्यांचे म्हणणे ऐकून घेतले व दोन दिवसात बैठक लावण्याची आश्वासन दिले. दरम्यान संतप्त कार्यकर्त्यांनी शासनाने तातडीने याबाबत निर्णय न घेतल्यास इथून पुढे मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही व एकही कार्यक्रम होऊ देणार नसल्याचे सांगितले. यावेळी वैभव कांबळे,धनाजी पाटील, संपत पवार ,सुरेश शिर्के ,जबाऊल भाई, संभाजी पाटील, राहुल पाटील, राजू गिड्ड, शशिकांत जनगोंडा, अण्णा मगदूम व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.