पालिका प्रशासनाने कामगार संघटनांना दिले पत्र
प्रतिनिधी/ सातारा
सातारा पालिकेच्या कर्मचायांना दिवाळीचा सानुग्रह अनुदान देण्यात यावे अशी मागणी कामगार संघटनांनी केली होती. त्यानुसार पालिका प्रशासनाने कामगार संघटनांना दिलेल्या पत्रानुसार दिवाळीपूर्वी कामगारांना सानुग्रह अनुदान 15 हजार रुपये देण्यात येईल, असे नमूद केले आहे.त्यामुळे सातारा पालिकेतील सानुग्रह अनुदानाचा तिढा आता सुटला आहे.
सातारा पालिकेत दरवर्षीच कर्मचायांना सानुग्रह अनुदान देण्यात येते.यावर्षी कामगार संघटनांनी पालिका प्रशासनाने मागणी केली. बैठका घेण्यात आल्या.त्यानुसार पालिका प्रशासनाने कामगार संघटनांना पत्र दिले आहे.त्यामध्ये स्पष्टच नमूद केले आहे की कोरोना संकट काळात जीवाची पर्वा न करता काम करणाया पालिका कर्मचायांना 2020-21मध्ये 15 हजार रुपये दिवाळी सानुग्रह अनुदान सर्वसाधारण सभेच्या पूर्व मंजुरीने देण्याचे मान्य केले आहे.मार्च 2021 पर्यत प्रोत्साहन भत्ता कर्मचायांना देण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. पालिकेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचायांना पावसाळ्यात काम करण्यासाठी रेन कोट पुरवण्याबाबत स्थायी समितीचा ठराव नंबर 63 दि.14 ऑगस्ट 2020 मंजुरी देण्यात आली असून त्याची वर्क ऑर्डर रेणुका इंटरप्रायझेस यांना देण्यात आले.पालिकेच्या आस्थापनेतील ब्रयाच कर्मचायांच्या नेमणूका एकाच ठिकाणी जबाबदारी मात्र वेगळ्या ठिकाणी आहे या मुद्यावर अहवाल मागवून घेऊन कार्यवाही करण्यात येईल असे म्हटले आहे.त्यामुळे सानुग्रह अनुदानाचा तिढा मिटला आहे.