अर्ज स्वीकारले प्रांतांनी, नगराध्यक्षांनी घेतली ऑनलाईन विशेष सभा
प्रतिनिधी/ सातारा
नवीन वर्षात खासदार उदयनराजे हे अनपेक्षित असे धक्के सातारकरांना देत आहेत. खासदार उदयनराजेंनी नवीन वर्षात पहिला धक्का ग्रेड सेपरेटरचे उद्घाट करुन दिला आता पालिकेच्या विषय समितीत सर्व सभापती महिला बिनविरोध निवड करुन दिला आहे. निवड झालेल्यामध्ये सिद्दी पवार, अनिता घोरपडे, रजनी जेधे, स्नेहा नलावडे आणि सीता हादगे यांचा समावेश आहे. त्यांच्या निवडीबद्दल त्यांच्या नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी शुभेच्छा दिल्या. खुर्चीत बसताच नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱयांचे स्वागत हारतुऱयांनी करण्यात आले.
सातारा पालिकेत प्रथमच सर्वच विषय समितींच्या सभापती या महिला आहेत. त्यामध्ये महिला सबलीकरण हे धोरण खासदार उदयनराजे भोसले यांनी समोर आणत नव्याने धक्कातंत्र दिला आहे. त्यामध्ये बांधकाम सभापती म्हणून भाजपाच्या आक्रमक स्वभावाच्या नगरसेविका सौ. सिद्धी रविद्र पवार यांना संधी दिली गेली आहे. तर पुन्हा आरोग्य सभापती म्हणून सौ. अनिता अशोक घोरपडे यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. बाकी इतरमध्ये सौ. सीता हादगे यांचे काम अतिशय चांगले असल्याने त्यांना पाणी पुरवठा विभागाची जबाबदारी तर पाठीमागे एकदा नियोजनाचा कारभार सुस्थितीत हाताळल्याने स्नेहा नलावडे यांच्याकडे नियोजनची जबाबदारी दिली गेली आहे. रजनी जेधे या महिला बालकल्याणची जबाबदारी दिली गेली आहे. सर्वच महिला पदाधिकाऱयांच्या नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांच्यासह सर्व नगरसेवकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांनी सर्व महिला पदाधिकाऱयांच्यावतीने आलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने पालिकेच्या ज्या ज्या विभागास निपटारा करण्याच्या सुचना दिल्या. मल्हारपेठेतल्या कुमार खंदारे याने रस्ता बंद केल्याची तक्रार शंकर त्रिंबके यांच्यासह महिलांनी करताच त्यांनी पालिकेच्या संबंधित विभागास कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या.
खासदार तिसरा धक्का देणार दि.16 रोजी
नवीन वर्षात खासदार उदयनराजेंनी दोन आश्चर्याचे धक्के दिले आहेत. आता तिसरा धक्का हा दि.16 रोजी देणार आहेत, अशी चर्चा पालिका वर्तूळात सुरु होती. त्यामुळे तो धक्का कोणता आहे, खासदार उदयनराजे हे दि.16 रोजी काय करणार आहेत, याकडे नजरा आहेत.