साहित्य : 1 पाकीट पास्ता, 1 चमचा लसूण पावडर, अर्धी वाटी चीज, व्हेजिटेबल ऑईल तळण्यासाठी, चवीपुरते मीठ, चवीपुरती काळीमिरी पावडर, आवश्यकतेनुसार रेड चिल्लीफ्लेक्स
कृती : जाड बुडाच्या पातेल्यात आवश्यकतेनुसार पाणी गरम करण्यास ठेवावे. पाण्याला उकळी आली की त्यात पास्ता घालून आठ मिनिटे शिजवावे. नंतर चाळणीत काढून पूर्णपणे कोरडे करून घ्यावे. गॅसच्या मध्यम आचेवर जाड बुडाच्या कढईत थोडे व्हेजिटेबल ऑईल ओतून गरम करावे. तेल चांगले गरम झाले की त्यात शिजवलेल्या पास्त्यापैकी थोडा पास्ता घालून सोनेरी रंगावर दोन मिनिटे तळून पेपरनॅपकीनवर काढावेत. आता राहिलेला पास्ताही गरम तेलात तळून घ्यावा. त्याच तेलात फोडणीसाठी लसूण पावडर टाकावी. त्यातच तळलेला पास्ता टाकावा. वरून मीठ, चीज, काळीमिरी पावडर, रेड चिल्लीफ्लेक्स टाकून मिश्रण मिक्स करावे. तयार पास्ता चिप्स स्नॅक्स म्हणून खाण्यास द्या.
टीप : यामध्ये आमचूर पावडरही वापरू शकता.