घरोघरी जाऊन मतदारांच्या घेतल्या गाठीभेटी
प्रतिनिधी / बेळगाव
मच्छे, पिरनवाडी या परिसरात सोमवारी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचार केला. प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे उमेदवार सतीश जारकीहोळी यांना मतदान करण्याचे आवाहन केले. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसने बेळगाव तालुक्मयासह परिसरात जोरदार प्रचार सुरू केला आहे. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आहे.
काँग्रेसचे पोटनिवडणुकीचे उमेदवार सतीश जारकीहोळी यांनी प्रचारामध्ये मुसंडी मारली आहे. माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे यांनी गेल्या काही दिवसांपासून बेळगावमध्ये ठाण मांडून प्रचार केला आहे. त्यांचे कार्यकर्ते ग्रामीण भागामध्ये काम करताना दिसत आहेत. शहरातील शहापूर, खासबाग, वडगाव यासह येळ्ळूर आणि त्यानंतर आता मच्छे, पिरनवाडी येथे प्रचार करू लागले आहेत.
प्रचाराचे आता काहीच दिवस उरले असून उर्वरित दिवसांमध्ये संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेसतर्फे विविध माजी मंत्री बेळगावात प्रचार करताना दिसत आहेत. त्याचबरोबर भाजपवर कडाडून टीका करत आहेत. महागाईचा मुद्दा घेऊन ते मतदारांसमोर जात आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रचाराला सर्वसामान्य जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आहे.
सोमवारी किरण पाटील यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी भर उन्हामध्ये जाऊन प्रचार केला आहे. प्रत्येक महिलांच्या गाठीभेटी घेऊन सतीश जारकीहोळी यांनी केलेल्या कार्याची माहिती देण्यात येत आहे. भाजप कशाप्रकारे दिशाभूल करत आहे याची माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे काँग्रेसला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.