मंगळवारी दिवसभरात 6 जणांना घेतला चावा : त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
भटक्मया कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी कोणतीच उपाययोजना हाती घेतली नाही. याचा फटका नागरिकांना बसत असून, पिसाळलेल्या कुत्र्याने समर्थनगर परिसरात 16 नागरिकांचा चावा घेतल्याची घटना घडली आहे. मात्र कुत्र्यांना पकडण्याचा अधिकार मनपाला नसल्याचे सांगून महानगरपालिकेच्या अधिकाऱयांनी जबाबदारी झटकली आहे. त्यामुळे भटक्मया कुत्र्यांचा बंदोबस्त कोण करणार, असा मुद्दा उपस्थित झाला आहे.
शहरात भटक्मया कुत्र्यांची संख्या दुप्पट झाली असून, कुत्र्यांची नसबंदी करणार असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱयांकडून सांगण्यात येते. मात्र तांत्रिक अडचणींमुळे निविदा प्रक्रिया राबविण्यात अडचणी येत असल्याने नसबंदी करण्याची प्रक्रिया देखील रखडली आहे. त्यामुळे भटक्मया कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यास महापालिका प्रशासन अपयशी ठरले आहे. सध्या शहरातील प्रत्येक गल्लीत भटकी कुत्री गटागटाने फिरत असून, नागरिकांचे जीव धोक्मयात आले आहेत. सध्या काही ठिकाणी रात्रीच्यावेळी नागरिकांना घरातून बाहेर पडणे देखील मुश्किल बनले आहे. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. पण प्राणी दया संघटनेच्या विरोधामुळे कोणतीच कारवाई करता येणार नाही, असे सांगून महापालिकेच्या अधिकाऱयांनी जबाबदारी झटकली आहे. त्यामुळे नागरिकांना जीव धोक्मयात घालण्याची वेळ आली आहे.
समर्थनगर परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने हैदोस घातला असून, गेल्या चार दिवसात 16 नागरिकांचा चावा घेतला आहे. यापैकी मंगळवारी दिवसभरात 6 नागरिकांना चावा घेतल्याची घटना निदर्शनास आली आहे. लहान मुले व वृद्धांना घराबाहेर पडणे कठिण बनले आहे. पिसाळलेल्या कुत्र्याची धास्ती वाढली असून, याकडे प्रशासनाने कानाडोळा केला आहे. मंगळवारी दिवसभरात सहा नागरिकांना कुत्र्याने चावा घेतल्याने याबाबत महापालिकेच्या अधिकाऱयांना संपर्क साधून तक्रार करण्यात आली. कुत्र्यांना पकडता येत नसल्याचे सांगून जबाबदारी टाळली. त्यामुळे समर्थ नगरमधील नागरिकांनी महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांना संपर्क साधुन पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची विनंती केली. पण प्राणी दया संघटनेच्या पदाधिकाऱयांचा विरोध असल्याने कोणत्याही कुत्र्याला पकडू शकत नाही. आम्हाला कुत्री पकडण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले. त्यामुळे या समस्येवर कसा तोडगा काढायचा, हा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला आहे. वास्तविक पाहता पिसाळलेल्या कुत्र्याला पकडून त्याचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. पण महापालिकेच्या अधिकाऱयांनी आपल्या जबाबदारीचे पालन करण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी समर्थनगर परिसरातील नागरिकांवरच वाढली आहे. महापालिका आयुक्तांनी ही बाब गांभीर्याने घेऊन पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.