नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आज ६१ वा वाढदिवस आहे. त्यांच्यावर सर्वच क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुम्हाला निरोगी दिर्घाष्यु मिळो, अशी प्रार्थना करतो, असं मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
यासोबतच शिवसेने नेते संजय राऊत, खासदार सुप्रिया सुळे, मराठमोळा फलंदाज अजिंक्य रहाणे, अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर निसर्ग कोपला असून पुरामुळे मृत्यू झाले आहेत. अनेकांच्या कुटुंबियांवर आघात झाल्याने महाराष्ट्र शोकाकुल असून कुणीही २७ जुलै रोजी येणारा माझा वाढदिवस साजरा करू नये असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.