प्रतिनिधी / कुंकळ्ळी
कुंकळ्ळीत नुकतेच दीड हजार मास्कचे वितरण करण्यात आले. हा उपक्रम कुंकळळी नगरपालिका, कुंकळळी व्यापारी संघटना आणि कुंकळळी कला व संस्कृती संस्था यांनी एकत्रितरित्या राबविला. सकाळी 8.30 वा. या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या मोहिमेत कुंकळळी पोलीस स्थानकाचे निरीक्षक थेरिन डिकॉस्ता, उपनिरीक्षक आदित्य गावकर सहभागी झाले. मास्क वितरित करण्यास उशीर झाला असला, तरी या स्तुत्य उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले.
सकाळी बाजारात बसून भाजी विकणारे विक्रेते, मास्क न वापरताच आलेले व बाजारात पोहोचलेले नागरिक तसेच दुचाकीचालक यांना मास्क देऊन योग्य ती खबरदारी घेण्याची यावेळी सूचना करण्यात आली. पालिका, कला व संस्कृती संस्था तसेच व्यापारी संघटनेने हे मास्क उपलब्ध केले होते. यावेळी पालिकेचे प्रभारी नगराध्यक्ष विदेश देसाई, मारियो मोराईस, नगरसेविका पेंजी कुतिन्हो, सुकोरिना कुतिन्हो, पॉलिता कार्नेरो, आंजेला पैंगीणकर, प्रेमदीप देसाई, कला व संस्कृती संस्थेचे अध्यक्ष ग्लेस्टन कुतिन्हो, माजी पोलीस उपअधीक्षक टोनी फर्नांडिस, संदेश नाईक, दिलीप नाईक, रोनाली आल्मेदा, बोर्जिस व इतर, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष इर्मेतिन कुतिन्हो, प्रसाद तळावलीकर, धीरज शिरवंत, संजय, राम तळावलीकर व इतर उपस्थित होते.