बिजिंग
आपल्या नव्या स्मार्टवॉचच्या निर्मितीवर काम करत असून पुढील वषी नवे स्मार्टवॉच ग्राहकांच्या हाती दिले जाणार असल्याचे वनप्लस कंपनीचे सीईओ पीट लाऊ यांनी म्हटले आहे. मागच्याच आठवडय़ात कंपनीने एक नवे स्मार्टवॉच दाखल करण्यासंबंधी सुतोवाच केले होते. त्यावरून ग्राहकांमध्ये नव्या स्मार्टवॉचविषयी उत्सुकता अधिकच वाढली होती. ग्राहकांच्या मागणीनुसार पुढच्यावषी सदर नवे स्मार्टवॉच बाजारात दाखल केले जाऊ शकते, असे कंपनीने म्हटले आहे. लॉन्चसंदर्भातली तारीख मात्र अद्याप कंपनीने स्पष्ट केली नसली तरी पुढच्या वषीच्या पहिल्या तिमाहीमध्ये वन प्लसचे नवे स्मार्टवॉच दाखल होऊ शकते.