ऑनलाईन टीम / पुणे :
पुण्यातील गोळीबार मैदानाजवळ असलेल्या कॅन्टोन्मेंट रुग्णालयात आग लागल्याची घटना समोर येत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, ही आग रुग्णालयातील आयसीयूमध्ये लागली आहे. एससीमध्ये काही तांत्रिक बिघाड असल्याने ही आग लागली असल्याचे समजते.
दरम्यान, सध्या रुग्णालयात किती रुग्ण उपचार घेत आहेत, किती जणांना बाहेर काढण्यात आले आहे याबाबतची माहिती अजून समोर आलेली नाही.