ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे विभागातील 1 लाख 11 हजार 449 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 58 हजार 781 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 43 हजार 223 इतकी आहे. कोरोना बाधीत एकुण 4 हजार 109 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.59 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 70.19 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 19 हजार 965 रुग्णांपैकी 91 हजार 389 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 25 हजार 821 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 755 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.30 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 76.18 टक्के आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 7 लाख 77 हजार 626 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 58 हजार 781 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.