ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे विभागातील 34 हजार 55 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 55 हजार 608 झाली आहे. तर ॲक्टिव्ह रुग्ण 19 हजार 846 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 1 हजार 707 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 672 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणााऱ्या रुग्णांचे प्रमाण 61.24 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.07 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पुणे जिल्हयातील 46 हजार 276 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 28 हजार 921 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. तर सध्या 16,139 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 11 हजार 543 , पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 3 हजार 136 व पुणे कॅन्टोंन्मेंट 121 , खडकी विभागातील 44 , ग्रामीण क्षेत्रातील 1 हजार 218 , जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 77 रुग्णांचा समावेश आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 2 लाख 79 हजार 118 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 2 लाख 73 हजार 519 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 5 हजार 599 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 2 लाख 17 हजार 339 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 55 हजार 608 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.