ऑनलाईन टीम / पुणे :
विभागातील 5 लाख 46 हजार 305 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 69 हजार 248 झाली आहे. तर ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 7 हजार 196 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 747 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.77 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 95.97 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 67 हजार 488 रुग्णांपैकी 3 लाख 53 हजार 70 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. सध्या जिल्ह्यात 5 हजार 630 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 788 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.39 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 96.08 टक्के आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 34 लाख 5 हजार 258 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 69 हजार 248 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.