ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे विभागातील 71 हजार 562 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 13 हजार 716 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण 39 हजार 145 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 3 हजार 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे विभागामध्ये बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 62.93 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.65 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 90 हजार 393 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 60 हजार 272 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 28 हजार 37 आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 18 हजार 13, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 5 हजार 864, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 912, कॅन्टोंन्मेंट 675, व ग्रामीण क्षेत्रातील 2 हजार 573 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे जिल्हयात कोरोनाबाधित एकूण 2 हजार 84 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 1 हजार 393, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 387, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 68, कॅन्टोंन्मेंट विभागातील 75, व ग्रामीण क्षेत्रातील 161 रुग्णांचा समावेश आहे. पुणे जिल्हयामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 66.68 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.31 टक्के इतके आहे.