- शहरात 2,222 सक्रिय रूग्ण
ऑनलाईन टीम / पुणे :
शहरात गुरूवारी 282 नवे कोरोना रूग्ण आढळून आले. तर 112 जण कोरोनातून बरे झाले आहेत. दिवसभरात शहरात 4 जणांचा कोरानामुळे मृत्यू झाला. तर पुण्याबाहेरील तीन जणांनी आपला जीव गमावला.
पुणे महापालिका क्षेत्रात विविध कोविड सेंटर, खाजगी लॅब, रूग्णालये आणि रॅपिड ऍण्टिजेन किटद्वारे दिवसभरात 9 हजार 278 नागरिकांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत बाधितांची टक्केवारी 3 टक्के इतकी आहे. शहरात आजपर्यंत चार लाख 94 हजार 467 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले असून, त्यातील चार लाख 83 हजार 343 जण बरे झाले आहेत.
सध्या शहरातील एकूण ऍक्टिव्ह रूग्णसंख्या 2 हजार 222 वर आली आहे. तसेच 210 गंभीर रूग्णांवर विविध रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 279 रूग्ण ऑक्सिजनवर आहेत. शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आठ हजार 902 इतकी झाली आहे.