ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातीलअवंतीपोरामध्ये आज सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आले.
पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथील गोरीपोरापरिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली. त्यानुसार गोरिपोरा परिसराला घेराव घालून शोध मोहीम हाती घेण्यात आली. दरम्यान, दशवाद्यांकडून झालेल्या गोळीबाराला सुरक्षा दलाच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर देत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.
बुधवारी जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्यातील मेहुलपूरा परिसरात दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलाच्या जवानांनी कंठस्नान घातले होते.