बीजिंग
चीनच्या मोठय़ा रॉकेटचा मार्च 5 बी चा कचरा हा मोठय़ा वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत आहे, अशी माहिती असून हा वेग असाच राहिला तर पुढील आठवडय़ात याचा काही भाग पृथ्वीवर कोसळून मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परंतु यावर चीनने मात्र या रॉकेटच्या कचऱयाचा कोणताही धोका नसल्याची बाब विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी स्पष्ट केली आहे. शंभर फूट लांब आणि 22 मेट्रीक टन वजनाचे असणारे हे रॉकेट चीनच्या नियंत्रणाबाहेर असून यावर नासाची नजर असल्याची माहिती आहे. पूर्वेकडील विभागाला याचे नुकसान होणार असल्याचे संकेत आहेत. मात्र चीनने या संकेताचे पूर्णपणे खंडन केले आहे. दुसऱया बाजूला अमेरिकन स्पेस कमांडने दिलेल्या माहितीनुसार नुकसान होण्याची शक्मयता अतिशय कमी असून जर का तसे काही नुकसान झालेच तर त्यांची भरपाई चीनलाच करावी लागणार असल्याची बाब स्पष्ट केली आहे.