नवी दिल्ली / वृत्तसंस्था :
युवा फलंदाज पृथ्वी शॉचा भारत अ संघात समावेश केला गेला असून यानंतर तो न्यूझीलंडला रवाना झाला आहे. सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत खांदेदुखीतून सावरण्यासाठी परिश्रम घेतले. यापुढे सर्व क्रिकेट प्रकारात तो संघासाठी उपलब्ध असेल, असे नियामक मंडळाने जाहीर केले. भारत अ संघ दि. 22 जानेवारीपासून न्यूझीलंड अ संघाविरुद्ध 3 वनडे व 2 अनधिकृत कसोटी सामने खेळणार आहे. त्यानंतर भारताचा वरिष्ठ संघ न्यूझीलंड दौऱयात 5 टी-20, 3 वनडे व 2 कसोटी सामने खेळेल. ही मालिका दि. 24 जानेवारीपासून खेळवली जाणार आहे.