प्रतिनिधी / बेळगाव
एकीकडे कोरोनाशी लढणाऱया नागरिकांना दुसरीकडे निकृष्ट दर्जाच्या पदार्थांचा सामना करावा लागत आहे. सध्या लहान मुलांना घरात बसून कंटाळा येत आहे. त्यामुळे कुरकुरे व तत्सम पॅकबंद चटपटीत पदार्थांकडे ती आकर्षित होत आहेत. मात्र या पॅकबंद पदार्थांमध्ये चक्क अळय़ा आढळल्याने ग्राहक भयभीत झाले आहेत.
मुख्य म्हणजे मुले एक्स्पायरी डेट बघत नाहीत. मात्र त्यांच्या पालकांनी तरी ती पाहणे आवश्यक आहे. चटपटीत पदार्थांच्या आकर्षणापोटी बऱयाचदा मुले पालकांच्या न कळत हे पदार्थ खरेदी करून न पाहताच खातात. मात्र अशाच एका उत्पादनामध्ये अळय़ा आढळून आल्या. वेळीच त्याकडे लक्ष गेल्याने मुलांनी त्याचे सेवन करण्याचे टाळले.
लॉकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी लोकांची धांदल उडते. मात्र पॅकबंद पदार्थ घेताना त्यावरील तारीख तपासणे आवश्यक आहे. अन्न व भेसळ नियंत्रण विभागाने लक्ष देऊन असे टाकावू पदार्थ विक्रीस येणार नाहीत, याची दक्षता घेणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.