नवी दिल्ली
बॅटरीनिर्मितीसह इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात कार्यरत असणाऱया पॅनासोनिक कॉर्प कंपनीने पहिल्या तिमाहीअखेर आपल्या नफ्यात जवळपास 27 पट अधिक वाढ नोंदवली असल्याचे समजते. त्यांच्या घरगुती उपकरणे व बॅटरीला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद नोंदवल्यामुळे सदरची वाढ झाली असल्याची बाब समोर आली आहे.
एप्रिल ते जून या कालावधीत कंपनीचा नफा 950 दशलक्ष डॉलर्सवर (104.4 अब्ज येन) पोहचला आहे, जो मागच्या वर्षी समान कालावधीत 3.8 अब्ज येन इतका होता. बाजारातील अंदाजानुसार नफा 50 टक्के अधिकच झाल्याचे स्पष्ट झाले आहे.