सर्व सौंदर्यवतींवर भारी, भारतीय नारी
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन अलिकडेच पती अभिषेक तसेच मुलगी आराध्यासोबत पॅरिससाठी रवाना झाली होती. ऐश्वर्या पॅरिसमध्ये आयोजित फॅशन वीकमध्ये भाग घेतला आहे. या फॅशन वीकमधील तिची काही सुंदर छायाचित्रे समोर आली आहेत. ही छायाचित्रे पाहून स्वतःच्या सौंदर्याने ऐश्वर्याने उपस्थितांना घायाळ केल्याचे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
ऐश्वर्या महिलांच्या विशाल लाइनअपमध्ये सामील होती. या दिग्गज सौंदर्यवतींमध्ये हेलेन मिरेन आणि एमबर हर्ड सामील होती. तसेच कॅमिलो कॅबेलो आणि कॅथरीन लँगफोर्ड देखील या फॅशन वीकमध्ये झळकली आहे. रॅम्प वॉकमध्ये ऐश्वर्या ब्रिटिश अभिनेत्री हेलेन मिरेनसोबत दिसून आली. तसेच नाओमि किंग आणि गेम ऑफ थ्रोन्समधील कलाकार निकालोज कोस्टर-वाल्डो यांच्यासोबत तिने रॅम्प वॉकमध्ये भाग घेतला आहे.
ऐश्वर्या यापूर्वी ‘फन्ने खान’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. तर सध्या ती तमिळ चित्रपटावरून चर्चेत आहे. लवकरच ‘पोन्नियनि सेल्वान’ आणि ‘गुलाब जामुन’ या चित्रपटात ती दिसून येणार आहे.