मुंबई
डिजिटल वित्त सेवा देणाऱया पेटीएम कंपनीचे समभाग शेअरबाजारात सोमवारी तेजीत असताना दिसले. सदरचे कंपनीचे समभाग हे सोमवारी बीएसईवर इंट्रा डे दरम्यान सुमारे 5 टक्के वाढत 653 रुपयांवर पोहचले आहेत. भारती एअरटेलचे सर्वेसर्वा सुनील मित्तल हे पेटीएममध्ये हिस्सेदारी खरेदी करणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या बातमीचा परिणाम म्हणून सोमवारी पेटीएमचे समभाग वाढताना दिसले.